पुरस्काराने सन्मान.....
राजगुरूनगर : राजगुरुनगर मधील क्रियाशील गणेशोत्सव मंडळ म्हणून ख्याती असलेल्या शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ नेहरू चौक या मंडळाचा गुणगौरव लोकमत कडून पुणे येथील कार्यक्रमात करण्यात आला. प्रतिवर्षी समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून तसेच भव्य दिव्य देखाव्यांमधून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश दादा गुंडाळ, रवी आवटे, दर्शन रावळ, मयूर घुमटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते विशेष परिश्रम घेऊन काम करत असतात. लोकमत तर्फे पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात गणेश मंडळातून विधानसभेत गेलेले आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते हा सन्मान दिला गेला.
पूर्वीच्या काळी गणेश मित्र मंडळातून तयार झालेले कार्यकर्ते हे राजकारणात पुढे जायचे त्यामुळे गणेश मित्र मंडळ यांना विशेष स्थान असायचे मात्र बदलत्या काळानुसार हि संकल्पना संपुष्टात येत आहे. मंगेश दादा गुंडाळ यांनी मात्र राजगुरुनगर शहरात गणेश मंडळापासून केलेली सुरुवात ते राजगुरुनगर शहराचे उपसरपंच, नगरसेवक हे तरुणांना प्रेरणादायी आहे. सध्याच्या काळात गरज सरो वैद्य मरो अशी प्रथा आहे. मात्र मंगेश दादा यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर देखील त्यांची मंडळातील सक्रियता कायम ठेवून नव्या पिढीला एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. शिव छत्रपती मित्र मंडळाचा पुणे येथे झालेला हा सन्मान राजगुरुनगर शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा असाच आहे. श्री शिव छत्रपती मित्र मंडळ यांना पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा...*